सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांची मागणी
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
वादळासह अतिवृष्टी त तालुक्याला आधार देऊन मदतीसाठी धावणारे खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांची बदली न करता मुदतवाढ देण्यात यावी यासाठी तालुक्यातील सामाजिक संघटना,जागरुक पत्रकार, राजकीय नेते मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना जनतेच्या सह्याचे निवेदन देणार आहेत.
कोरोना मुळे प्रशासकीय बदल्या थांबल्या होत्या. दुसरी लाटेचा प्रभाव कमी होताच बदलीसत्र सुरू झाले. रायगड मध्ये कोरोना मध्ये हॉटस्पॉट ठरलेला खालापूर तालुका वादळात देखील कोलमडून पडला होता. सर्वसामान्य आदिवासी शेतकरी परप्रांतीय कामगार त्यांच्यासह हातावर पोट असणाऱ्या अनेकांना तहसीलदार चप्पलवार यांनी देव दुतासारखी मदत केली होती.


चाकोरीबाहेर जात मदत देखील करताना दिवस-रात्र धावपळ केली. अजून तालुका या संकटातून सावरला नसून कोरोना ची तिसरी लाट आल्यास तालुक्याची पूर्ण माहिती असलेली जनसामान्यापर्यंत पोहचलेले तहसीलदार चप्पल वार योग्यरितीने हाताळू शकतील अशी खात्री सर्वांनाच आहे. तहसीलदार चप्पल वाघ यांची रत्नागिरी येथे झालेली बदली रद्द करून आणखी एक वर्ष मुदतवाढ देत खालापूर तालुक्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी होत आहे.








Be First to Comment