एबीपी माझा चे स़ंपादक राजीव खांडेकर यांनी प्रमुख उपस्थिती
सिटी बेल | कामोठे |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्या संकुलात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेला एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पमपा विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सूरदास गोवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पमपा जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे आदींसह शेकापचे पदाधिकारी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींसह सर्व पक्षिय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment