Press "Enter" to skip to content

रसायनीतील मनसैनिकांकडून पुरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाड आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता.पाण्याने उच्चतम पातळी गाठून त्याच रौद्ररूप दाखवलं.पण माणसातील माणूसपण आणि माणुसकी जागली आणि मदतीचा ओघ सुरू झाला.या पुरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून रसायनी-पाताळगंगा विभागातील मनसैनिकांनी जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले.

राज साहेबांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दिपक कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर डुकरे,फुलचंद लोंढे,अर्जुन डुम्बरे,सूर्यकांत पडवळ, विशाल निंबाळकर,संजय पाटील,विनय कोशे, विकास राठोड,संतोष वेदपाठक, श्रीधर परब, अर्जुन चव्हाण, शेखर माने,अनिकेत अंबुले,सौरभ गायकवाड आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन महाड येथील हानी झालेल्या गावांमध्ये, प्रत्यक्ष मदत पोहचवली.

आसनपोई या गावात तीन दिवस सरकारही पोहचले नाही तेथे रसायनीतील मनसैनिक सर्वप्रथम पोहोचले.त्याच प्रमाणे मोहोत,कुंभार वाडा,खरीवली इ.गावात मदत पोहचलेली. पूरग्रस्त भाग बिरवाडी एम.आय.डीसी मधी अडकलेल्या परप्रांतीय लोकांनाही भरपूर मदत पुरवली.सदर मदत कार्यात माजी सभापती गजानन माळी,डाॅ.पदमाकर मते, महेश पाटील (कासप), जगन्नाथ शेट्टी, सुवर्णा शेट्टी, सुधाकर आण्णा शेट्टी,रामान्ना शेट्टीगार, दामू कुरंगाळे, राकेश चौधरी, प्रशांत मिरजकर,उमा पुराणिक, प्रल्हाद बोडके,रमेश अंबुले,गाताडे, गणेश काळे,तुषार ठाकुर,आकाश मुंढे,हरी ओम पार्क व कस्तुरी बिल्डिंग मधील रहिवासी तसेच मोहोपाडा व वावेघर व्यापारी बंधूंनीही सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.