Press "Enter" to skip to content

महाड व तलीये या गावात जाऊन मनसे तर्फे पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकांनी महाड व तलीये या गांवात जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, कपडेचे वाटप केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रोजगार स्वयंरोजगार विभाग संघटक रायगड जिल्हा रोजगार अध्यक्ष तथा नावडे विभाग तलोजा MIDC -रामदास पाटील,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वाहतूक-प्रवीण दळवी, उपतालुका पनवेल अध्यक्ष-कैलास माळी, मॅनेजर -अमोल जोशी,मॅनेजर -दिलीप पारसणीस, मॅनेजर -सोमनाथ मलगर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पूरग्रस्तांना मदत केली. रायगड जिल्ह्यातील महाड व ग्रामीण भागात तलीये येथे अतिवृष्टी झाल्याने त्या नागरिकांची गैरसोय झाली होती.

येथील नागरिकांना सर्व सुविधा पासुन वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना मनसे तळोजा MIDC, नावडे विभाग तर्फे महिलांसाठी 800 साडी व जिवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.