Press "Enter" to skip to content

दि बा प्रेमी करत आहेत मशाल मोर्चाची जय्यत तयारी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

सोमवारी ०९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता स्व.दि.बां च्या स्मृतीस्थळ जासई (उरण ) येथील आयोजित क्रांती दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रेरणा मशाल प्रज्वलित करण्यात येणार आहे.

या प्रेरणा क्रांती ज्योतीद्वारे गावागावांत दि.बां.ची स्फूर्ति धगधगणार आहे. त्यानुसार जासई येथून नवी मुंबई शहरासाठीची मशाल शिरवणे विद्यालय, सेक्टर०२, नेरुळ या ठिकाणी ०९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०४ वाजता नेण्यात येणार आहे. नवी मुंबई शहरात मशालीद्वारे गावागावातील मशाली प्रज्वलित करून मग गावांतील अनेक मशाली प्रज्वलित केल्या जातील. आणि ग्रामस्थ एकजुटीने शांततेने सायंकाळी ०७:३० वाजता मशाल मार्च काढणार आहेत ज्यात दडपशाही चले जावचा नारा अधिक तीव्र करणार आहेत.

या मशाल मार्च कार्यक्रमाचे घोष वाक्य खालीलप्रमाणे आहे – ९ ऑगस्ट क्रांती मशाल मार्च सुरु करु या,
१६ ऑगस्टला विमानतळ काम बंद करु या…!!!

लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य या लढ्यात सहभागी होणार आहेत.

सदर मोर्चाची तयारी जोरात चालू असून लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण लढ्यातील सिडको विरुद्ध एकपात्री नाट्यअभिनय द्वारे आंदोलनाचे सुरवात करणारे शैलेश घाग (नेरुळ )यांची ही मशाल मोर्चाच्या तयारीची व्हिडीओ. मशाल बनविताना कलाकार शैलेश घाग.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.