ताज्या गावरान भाजीला ग्राहकांची पसंती
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
दर वर्षी पावसाचे आगमन होत असल्यामुळे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणत भाज्यांची लागवड करीत असतात.या वर्षी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला परंतु मागील आठवड्या पासून अल्प प्रमाणात भाज्या दाखल झाल्यामुळे गृहिणीनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने ह्या भाज्या खरेदी करण्याचा कल ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक जण या भाज्या आवडीने खरेदी करीत असतात.या भाज्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने प्रत्येकाला रोजगार मिळत असतो.तसेच घरचे भागवणे सोपे जात असते.या पावसाळ्यात तयार झालेली ताजी भाजी खरेदी करीत असल्याचे दृश्य बाजार पेठेत दिसत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने काकडी,माठ पालक, मिरची, आळूची पाने,भेंडी या तसेच,रानातील भाज्यांचा समावेश असून प्रत्येक जण या भाज्या खरेदी करीत आहे.पावसाच्या पाण्यावर निर्माण होत असलेली भाज्यामध्ये विविध घटक सामावले असून आरोग्यासाठी आरोग्य दायक आहे.शिवाय या सर्व पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, क जीवनसत्व, ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.यामुळे प्रत्येक जण या भाज्या खरेदी करण्यास मग्न झालेचे चित्र बाजार पेठेच्या ठिकाणी विक्रीस आलेले पहावयास मिळत आहे.
चौकट : पावसाळ्यात माळरानावर भाज्यांची लागवड केली आहे.या वर्षी पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे पावसाच्या जोरदार सरी मुळे भाजी तयार विलंब झाला.मात्र एक आठवड्यात मोठ्याप्रमाणावर भाज्या विक्रीस येईल ( भाजी विक्रिते – सगुणा वाघे )








Be First to Comment