सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीवरील पुल वाहातुकीसाठी धोकादायक असुन या पुलाचे कठडे तुटले असुन या कठड्यांना दोरीचा आधार दिला आहे.अशी बातमी २८ जुलै रोजी वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली यानंतर फक्त आठ दिवसात या बातमीची दखल घेत या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांना नवीन लोखंडी पोल बसवले असून यामुळे प्रवाश्यांनी वृत्तपत्राचे आभार मानले.
या महिसदरा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांना लोखंडी पोल बसविले असल्यामुळे थोडा फार प्रमाणात धोका टळला असला तरीही हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे. कारण या पुलाचे परीक्षण करणे जरुरीचे आहे. या पुलावरुन अवजड वाहन गेला तर हा पूल पूर्णपणे हदरला जाऊन वरखाली जम मारल्या सारखा दिसत आहे.अशा वेळी योग्य ती खबरदारी घेणे जरुरीचे आहे.नाहीतर सावित्री नदी पुलाच्या दुर्घटनाच्या सारखी परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.








Be First to Comment