Press "Enter" to skip to content

सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महाड, चिपळूण च्या पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

काही दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूण याठिकाणी अतिवृष्टीचा मुळे महापूराच्या विळख्यात अडकून पडले आणि निसर्गाच्या विक्राळ रूपाने लोकांचे संसार उध्वस्त केले. सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया नेहमीच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कार्यरत असते. त्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात या भागासाठी मदतीचा हात दिला आहे.
   

 प्रशांत पाटील महाराष्ट्र सचिव सत्यमेव जयते ट्रस्ट यांच्या विशेष आयोजनातून, विरार येथील तुकाराम आंबो पाटील यांनी दिलेल्या प्रेरणेने त्यांचे चिरंजीव विकास पाटील यांच्या कल्पनेतून, आशुतोष गहिवाल आणि आंबो वाडी मित्र परिवार, व्हिजन ह्यूमॅनिझम यांच्या संयुक्त संकल्पनेतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्तांना अल्पशी मदत किंबहुना दुःखावर अंशतः फुंकर घालण्यासाठी या सगळ्या संघटना मिळून मदत घेवून पोहोचल्या.

१ टेम्पो धान्य, पिठ, कपडे, ब्लॅकेट, बिस्कीट, पिण्याचे पाणी, बल्ब, स्यानिटाईझर, हॅण्डवॉश, सॅनिटरी पॅड् पॅकेट, पॅकेज फूड बराच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी आपल्या कोकणतिल बांधवांना केले आणि स्वच्छतेच्या कामात हातभार देखील लावला. जे शक्य झाले त्या वस्तुरुपी, खाद्यरुपी आणि वस्त्ररुपी संग्रहातून सहकार्य म्हणून आधी चिपळूण मग महाड  येथे जाऊन वाटप करण्यात आले.

महाड मध्ये पुन्हा एकदा मदत पाठवण्याचा मानस प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला कारण तेथील पूर्ण गावच उद्ध्वस्त झाले आहे. खरोखर मोलाची कामगिरी करून लावलेला हातभार खूप काही शिकवून जातो. कोणताही आविर्भाव न आणता पोटतिडकीने केलेले काम समाधान देते हीच भावना सर्व मित्र परिवाराची होती. पण आपण कितीही केले तरी या पूरग्रस्त नागरिकांचे दुःख फक्त हलके करू शकतो असे सांगून या संकटातून ते लवकर उभारी धरोत हीच मनोकामना सर्वांनी व्यक्त केली.

ह्या वेळी संदीप पाटील, नितीन बने, केदार सावंत, महेश खाके, हितेन, रितेश पाटील, प्रफुल्ल शिंदे, चिन्मय जोशी, राज मन्सूरी, शमीम शेख, आरिफ, आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या अध्यक्षा शितलताई मोरे यांनी सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त केले, ही मदत नसून आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे, पुढेदेखील आपण अशीच सामाजिकबांधिलकी जपू अशी भावना व्यक्त केली.         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.