रायगड जिल्हा बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेच्या रोहा शाखेने मदतीचे कर्तव्य निभावले
सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
२१ व २२जुलै रोजी झालेल्या आस्मानी निसर्ग प्रलयात संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला.जखमी कोकण झाला. सह्याद्रीच्या परिसरात भयावह परिस्थिती निर्माण झाली. जे वर्षानुवर्षे कधीच घडले नाही ते या वर्षी घडले ! जो पाऊस २१ आणि २२ जुलैला पडला तो मागच्या सत्तर ऐशी वर्षात कोणीच पाहीला नसावा असे बोलले जाते. तीन तासात पाऊस काय पडतो आणि हजारों वर्षांपासून उभे असलेले कोकण भुमीचे रक्षक म्हणून डोंगर कडे क्षणारर्धात उन्मळून खाली घसरतात ही एक शोकांतीकाच आहे.
महाराष्ट्र ज्याच्या भरोशावर पाणी पाऊस निर्गमीत करीत असतो त्याच सह्याद्रीच्या कुशीला अक्षरशः उभ्या-अडव्या भेगा गेल्या. शंभरीतील अनेक जुनाट वृक्षे अशा महा प्रलयकाळाला नतमस्तक झाले. त्याच सह्याद्रीच्या कुशीकपारीत आस्रहीत असलेल्या वाड्या-वस्त्या पूर्ण नेस्तानाबूत झाल्या. हाहाकार माचला आणि अनेकांचे संसार उद्धस्त झाले. अनेकांचे जीव गेले, अनेकांना स्वतःचा मृत्यू दिसत होता तर काहींना जीवंतपणीच भुगर्भाने कवटाळले. सारे होत्याचे पार नव्हतं झाले !

अतिवृष्टीने विद्रोह अवस्ता निर्माण झाली. अशा विद्रोह परिस्थितीत. बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा-रायगड यांना कळवळा आला. त्यांनी थोडक्या कालावधीमध्ये एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे “मदत नव्हे तर कर्तव्याचा!” पुरग्रस्तांना अनेकांनी वेगवेगळ्या स्वयंसंस्थान माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. पण बळीराजा शेतकरी संघटनेने स्वतःच्या ताटातील एक घास माझ्या संकटातून वाचलेला बाधीत हा माझाच कोणीतरी कुटुंबिय आहे या भावनेतून त्यांनी आपल्या घरातील जमा खावटीतून मदतीचा हात दिला. कुणी, तांदूळ, गहू, डाळ, साखर, मिठापासून ते खाऊ, साबण, तेल मेणबत्ती, माचीस, मच्छर अगरबत्ती ते पाणी या जीवनावश्यक वस्तू देण्याचा मौलिक प्रयत्न केला.
ही गोळा केलेली मदतनीसांची मदत पॅकिंग किट बनविण्यात शिवाजी मुटके साहेबांच्या परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले असे संस्थेतील ज्येष्ठ बामुगडे काका यांनी सांगितले. तर ती सुपूर्त करण्याकरिता रोहा विभागातील बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री. शिवाजी मुटके साहेब, दगडू बामुगडे काका, राजेंद्र जाधव, राजेंद्र शिंदे, धाऊ कोकळे, नामदेव धोत्रे, तानाजी मोरे भाऊ, सोमनाथ खेरटकर बंधू, किशोर खेरटकर तसेच चणेरा विभागातील, श्री रघुनाथ कडू साहेब, नागोठणे विभागातर्फे श्री. अनिलसाहेब लाड व त्यांचे सहकारी आणि माणगांव विभागमधून मारुती बागवे व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते महाड पुरग्रस्तांना सामानाच्या किटचे वाटप करण्यात आले.
वाटप करण्याकरिता सर्वप्रथम महाड बिरवाडीतील कुंभारआळी हे गाव निवडले व तेथील पुरग्रस्तांना आणलेले किट दिल्यानंतर नांगलवाडी आणि कोंडीवते या गावांना किट मदत करण्याचा योग आला असे शेवटी त्यांनी सांगितले. कोंडीवते गावी वाटप झाल्यानंतर तेथीलच ग्रामस्थांपैकी श्री. भिकू पांडुरंग किजबीले हे तेथील तंटामुक्त संघटना अध्यक्ष यांनी आनंदाश्रुंनी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेने मदत केल्या बद्दल आभार मानले.
हे सारं निभावण्याचं काम आपले बळीराजा शे.सा.सं.चे सल्लागार श्री. रघुनाथ कडू यांनी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त होत आहेत.








Be First to Comment