सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
भारतीय मजदूर संघाची प्रायव्हेट सेक्टरची राष्ट्रीय बैठक नुकतीच भोपाळ येथे पार पडली. या बैठकीस देशातील सर्व उद्योग क्षेत्रातचे प्रतीनिधी उपस्थित होते. अन्य प्रायव्हेट सेक्टरच्या उद्योगांचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीचे अध्यक्ष अखिल भारतीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन हे होते.प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष के.पी.सिंग, B.M.S. चे भोपाळ प्रदेश अध्यक्ष संजय सिंग, राष्ट्रीय नेते अण्णा धुमाळ, पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, राष्ट्रीय सचिव, रविंद्र हिमटे , विनोद शर्मा, इत्यादी उपस्थित होते.प्रायव्हेट सेक्टर उद्योगामध्ये टेक्सटाईल,ट्रान्सपोर्ट,वेअर हाऊशिंग,पेपर इंडस्ट्रीज, पोर्ट इंडस्ट्रीज, कटलरी इंडस्ट्रीज,बँक, व्यापार,असंघटित क्षेत्र, औषधे अशा अन्य उद्योगांचे राष्ट्रीय नेते, पदाधिकारी,वेगवेगळ्या राज्यातून उपस्थित होते.या सभेमध्ये उद्योग, सामाजिक सुरक्षा, रोजगार, कामगारांवर होणारे अन्याय, समस्या इत्यादी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लठा करणे व पुढची दिशा ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली, तसेच प्रायव्हेट सेक्टरचे कार्यक्षेत्र आणि कार्य विस्तार वाढविण्यासाठी सविस्तर पणे चर्चा करण्यात आली.उपस्थित सर्व पदाधिकारी व नेते यांना बी.सुरेंद्रन, के.पी.सिंग, संजय सिंग, अण्णा धुमाळ व सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.








Be First to Comment