Press "Enter" to skip to content

पूरग्रस्तांच्या मदतीला बचत गटांच्या महिलांची साथ

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त दूर्गम दाभिळ गावात केलं वाटप

सिटी बेल | शैलेश पालकर | पोलादपूर |

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या प्रयत्नातून पोलादपूर तालुक्यातील दूर्गम दरडग्रस्त दाभिळ गावासाठी दिलेली मदत रस्त्यावरील दरडी मोकळ्या होऊ लागल्यानंतर वाहनांनी रवाना करण्यात येऊन दाभिळ ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी स्वतः यावेळी उपस्थित राहून मदतकर्ते संतोष ठाकूर आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते बंधू व भगिनींना धन्यवाद दिले.

अतिवृष्टीमुळे कोकणातील चिपळूण व महाड, पोलादपूर या तालुक्यात झालेल्या महापुराने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे. ह्या पुराग्रस्ताना मदत करण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि रायगड जिल्हा परिषदे कडून केल्यानंतर कोकण कट्टा (विलेपार्ले) राष्ट्र सेवा दल (रायगड) आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था (बांधनवाडी) पनवेल यांच्या वतीने पुराचे पाणी ओसरताच २३ जुलै पासून राष्ट्र सेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरग्रस्तांसाठी तात्काळ मदतकार्य सुरू केले असून अत्ता पर्यंत ३ टीम अतिशय दुर्गम दरडग्रस्त गावांमध्ये जाऊन पाणी,चादर, ब्लेंकेट्स, टॉवेल,मेणबत्या, माचीस साड्या, शर्ट पॅन्ट, अंतरवस्त्र, बिस्किट्स सुके आणि तयार खाद्य पदार्थ वाटप करीत आहेत. या मदत कार्यात आता पनवेल तालुक्यातील लाडीवली, आकुलवाडी, दुष्मी गावांतील सर्वसामान्य कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांनीही पुढाकार घेतला आहे.

शुक्रवारी (३०जुलै ) ह्या महिलांची पहिली तुकडी महाड तालुक्यातील तळिये, आसनपोई आणि पोलादपूर तालुक्यातील दाभिळ टोक येथे गेले होते. ग्राम संवर्धन संस्थेचे समन्वयक उदय गावंड, जन संपर्क अधिकारी राजेश रसाळ, लाडीवली येथील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी विजया मांडवकर, रेखा कालेकर, राजेश्री म्हामणकर, दर्शना म्हामणकर, निता वाघे, प्रशाली शेडगे, राजू पाटील, रणजित पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, मानसी सचिन पाटील, तेजस चव्हाण, शैलेश कोंडसकर, जयेश शिंदे, डॉ.आर.के.लोखंडे, कैलास महर, प्रविण भोईर, प्रविण गावंड, नितीन शेरमकर, विजय मांडवकर, गो ग्रीन नर्सरीचे प्रतिनिधी सलमान शेख, कोकण कट्टाचे मानिष माईन, सागर मालाप यांची उपस्थिती होती. अजूनही मदतीची गरज असल्याने यासारखी मदत गोळा करून पाठविणार आहोत तरी या कार्यात मदत दात्यानी पुढे येवून पुरग्रस्त बाधंवासाठी वस्तुरूपी किंवा आर्थिक मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले आहे.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण कट्टा, राष्ट्र सेवा दल, आणि ग्राम संवर्धनचे कार्यकर्ते अथक प्रयत्न केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.