Press "Enter" to skip to content

मुरुडमध्ये इतिहास उलगडला ; केनेपाखाडीत आढळली ऐतिहासिक गधेगळ

वाचा गधेगळ म्हणजे काय ? काय आहे त्याचे ऐतिहासिक महत्त्व

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरुड शहरात केनेपाखाडीतील संदेश जनार्दन केने यांच्या नारळ सुपारी बागायतीमध्ये अनेक वर्षांपासून एक साडेपाच ते सहा फूट उंचीची दगडी शिळा पडलेली होती, परंतु त्याचे महत्व माहिती नसल्याने ती दुर्लक्षित शिळा तशीच पडून होती. त्यावरील कोरीव काम खालच्या बाजूस असल्याने लक्षात येत नव्हते.

त्या शिळेचा उपयोग करण्यासाठी त्यांनी ती शिळा उभी केली असता त्यावर काही चित्र कोरल्याचे आढळले. ती चित्रे म्हणजे वराह रूप घेतलेले विष्णूचा अवतार आहे, समजून त्या शिळेची पूजा अर्चाही सुरु केली. परंतु एक दिवस संदेश यांनी मुरुड मधील इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांना ती शिळा दाखवली. त्यांनी त्या शिळेचे निरीक्षण केले असता शिळेच्या वर चंद्र, सूर्य व कलश तसेच खालच्या बाजूस एक गाढवाचे चित्र व एका स्त्रीचे चित्र कोरलेले आढळले. मधल्या भागाचे शिलालेख व चित्र अस्पष्ट आहेत. मात्र ती गधेगळ असल्याचे अनिकेत यांनी सांगितले.

गधा म्हणजे गाढव व गळ म्हणजे दगड. मुरुडमध्ये सिद्धी संस्थानच्या आधीही येथे लोकसंस्कृती नांदत होती. त्याआधी कोकणामध्ये शिलाहारांनी राज्य केले. त्यानंतर काही काळ यादवांचे राज्य होते. गधेगळ ही शिलाहार काळात सुरु झालेली प्रथा इस्लामी राजवटीपर्यंत सुरु होती. गधेगळ म्हणजे आयताकृती दगडी शिळेवर कोरलेली राजआज्ञा म्हणजे एकप्रकारे दानपत्र होते. राजांनी एखाद्यास जमीन किंवा अन्य प्रकारचे दान दिल्यास त्या सोबत गधेगळ दिली जायची, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.