Press "Enter" to skip to content

धक्कादायक : रेशन दुकानदाराना गोणीत मिळतंय कमी धान्य

मिळणारे धान्य वजन करण्यात येत नाही तो पर्यंत ते घेणार नसल्याचा रास्त धान्य दुकान संघटनेचा इशारा  


सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |

रास्त धान्य दुकानदाराना ठेकेदाराकडून कमी धान्य वितरण केले जात आहे तेव्हा ते वजन करून देण्यात यावे त्याच बरोबर दुकानदारांना धान्य वितरण लाभार्थी यादीसह लेखी परिपत्रक व दुकानात धान्य वजन करून मिळत नाही तोपर्यंत शासकीय धान्य दुकानात उतरवून घेतले जाणार नाही. असा धमकी वजा इशारा रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल विक्रते वेल्फेअर असोसिएशन पनवेल यांनी नायब तहसीलदार यांना दिला आहे. 



जागतिक कोरोना महामारीच्या काळात सामान्य जनतेला त्रास सोसावे लागत आहे तसेच पावसाळा , पूरपरिस्थिती , संभाव्य सणामुदीच्या दिवसात लाभार्थी कार्डधारकांची गैरसोय आणि धान्यापासून वंचित राहू नये , याची आमच्या संघटनेला पूर्ण जाणीव आहे.  त्याबददल संघटना मनापासून दिलगिरी व्यक्त करीत आहे परंतु आमच्या दैनदीन अडीअडचणीत व प्रलंबित मागण्यां सोडविण्यांची प्रशासनाची अजिबात इच्छा नाही तसेच लाभार्थी कार्डधारकांचे धान्य कपात करून दुकानदार व गरीब जनतेला वेठीस धरले जात आहे  यावावत दुकानदारानी नाराजी व्यक्त केलेली आहे . 


शासकीय कल्याणकारी धोरणानुसार धान्यापामृन कुणीही वंचित राहू नये अशी शासनाची स्पष्ट भूमिका असताना सुद्धा काही अधिकारी वर्ग अलिखित व तोंडी आदेशानुसार अंगठा अधिप्रमाणित होईल , त्यालाच धान्य देण्यात यावे अशी मनमानी करीत आहेत बायोमेट्रीक पध्दतीने अंगठा घेवून धान्य वितरण करण्याची सक्ती आणि त्यानुसार धान्य मंजूर करण्यात आले असल्यामुळे मंजूर नियतना प्रमाणे यादीसह लेखी परिपत्रक अनिवार्य आहे . दुकानदारांना लेखी परिपत्रक अथवा हमी मिळत नाही , तोपर्यत  ऑगस्ट महिन्यातील धान्य उचल , चलन भरणा व धान्य वितरण न करण्यांचा संघटनेला निर्णय घेतला  आहे . 

गोणीचे वजन तपासले असता गोणीमह ४८ किलो धान्य ‘ भरणा असल्याचे  दुकानदारानी मिळत आहे. तालुक्यातील धान्य दुकानात पाच झालेला धान्यसाठा वजन ५० किलो ५५० ग्रॅम प्रति गोणीमह थापी मारतात. हमालीसह पोहच करण्यांची जवाबदारी वाहतुक ठेकेदाराची असताना सुद्धा हमालीची मागणी करण्यात येते.  शासकीय नियमानुसार धान्य वहातुक वहानामध्ये वनज काटा उपलब्ध असणे आवश्यक आहे . त्यामुळे दुकानदारांना धान्य वितरण लाभार्थी यादीसह लेखी परिपत्रक व टुकानात धान्य वजन करून मिळत नाही तोपर्यंत शासकीय धान्य दुकानात उतावून घेतले जाणार नाही असा इशारा रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल विक्रते वेल्फेअर असोसिएशन संघटनेने पनवेल नायब तहसीलदार यांना लेखी निवेदनाने दिली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.