Press "Enter" to skip to content

नगरसेविका सुशिला घरत यांच्याकडून ६०० पूरग्रस्त कुटुंबाना रेशन किटची मदत

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला जगदीश घरत यांनी महाड येथील पूरग्रस्तांना रेशन किट व पिण्याच्या पाण्याची मदत करून सेवा केली.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुराचे संकट आले. या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात आणि धीर दिला जात आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून भाजपच्या सुशिला घरत यांनी रविवारी महाड येथे जाऊन ६०० कुटुंबांना अन्नधान्याचे किट आणि पिण्याच्या पाण्याची मदत केली.

यावेळी त्यांच्यासोबत मदत वितरित करण्यासाठी लक्ष्मी चव्हाण, रंजना पाटील, विद्या ससाणे, शारदा माने, राणी लोंढे, प्रविण चव्हाण, राहुल इंगोले, प्रदीप चव्हाण, श्रीराज, साहिल पाटील, निरज इंगोले, किरण पटेल, प्रविण वाडेकर, गणेश साळुंखे, रोहित इंगोले आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल पुरग्रस्तांनी सुशिला घरत यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.