सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाड आणि आजूबाजूच्या परीसरातील जनता पुराच्या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांचा धीर खचलेला आहे, हतबल झालेली आहेत.पण डोळ्यातील चमक मात्र तशीच आहे, ही त्याचीच ग्वाही आहे की मी पुन्हा भरारी घेईन.पुराच्या पाण्याने सर्वकाही हिरावून घेतल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाज रायगड-ठाणे, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमा महाड-बिरवाडी पूरग्रस्त ठिकाणी जाऊन जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीचा हात दिला. यावेळी गुरव समाजाच्या चौक तुपगावासह खालापूर तालुक्यातील तरुणांनी नैतिक कर्तव्य समजून मदत केली.
महाड आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता, पाण्याने उच्चतम पातळी गाठून त्याच रौद्ररूप दाखवलं, पाणी ओसरल्यावर शिल्लक राहिला तो फक्त चिखल मातीचा गाळ, माणसं फक्त आपलं माणूस जागेवर आहे की नाही याचाच शोध घेत होती, घरातील आणि घराबाहेरील सामान, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक सामान केव्हाच वाहून गेले होते. मोबाईल फोन हे तर केव्हाच नाकाम झाले होते कारण लाईट केव्हाच गेली होती.

पण माणसातील माणूसपण आणि माणुसकी जागली आणि मदतीचा एकेक हात पुढे व्हायला लागला.महाड तालुक्यातील खेड्यातील नागरिकांना मदत व्हावी यासाठी एकेक हात पुढे येवू लागला.यातून रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाज रायगड,ठाणे, मुंबई यांच्यावतीने जिवनावश्यक वस्तूंचे किट, लहान मुले, महिलांकरिता कपडे,साड्या, पिण्याचे पाणी असे साहित्याने भरलेले वाहने महाड तालुक्यात नेऊन तेथील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.तेथील परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले.
यावेळी गुरव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर, संस्थेचे युवक प्रदेश अध्यक्ष विजय ठोसर,अध्यक्ष बंडू खंडागळे, अखिल गुरव समाज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमोल गुरव, उपाध्यक्ष रमेश गुरव,युवक अध्यक्ष विशाल गुरव, उपाध्यक्ष सचिन गुरव,भाऊ दलवी, विजय साळूंके, लक्ष्मण गुरव,संजय गुरव, राहुल गुरव, प्रदीप बागूल, अविनाश खंडागळे,हरेश खंडागळे, आप्पा खंडागळे, संजय मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment