Press "Enter" to skip to content

रोहा चिल्हे ग्रामस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंची मदत

सिटी बेल | खांब | श्याम लोखंडे |

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड पोलादपूर येथे झालेल्या पूरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले घरात साठवून ठेवले समान सुमान सारे वाहून गेले. त्याना आता सर्व स्तरातून मदत पोहोचत आहे.

याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील ग्रामस्थ व महिला, युवक युवती चिल्हे यांनी एकत्रितपणे प्रत्येक घरातून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोणी तांदूळ कोणी गहू कोणी कडधान्य तर कोणी नवं नवे कपडे तर काही वस्तू स्वरूपात व काही पैशा स्वसरूपात मदत गोळा करत पूरग्रस्तांना आधाराची साथ मदतीचा हात ही भावना मनात निर्माण करत दोन टेम्पो भरून दोनशेहून अधिक किट तयार करत तेथील कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सर्व युवकांच्या मदतीने करण्यात आले‌

महाड शहरासह ,तसेच परिसरातील भागात पूरपरिस्थितीत व्याकुळ झालेल्या कुटूंबाना चिल्हे ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचे ठरवले.यासाठी फक्त गावात एक दवंडी पेटवताच एकच दिवसात दोनशेहून अधिक कुटूंबियांना पुरेल असे दोनशे किट तयार करत त्यामध्ये पाणी बोटल्स,तांदूळ,आटा, मसाला,साखर, मूग,चणे, चहा पावडर, बिस्किटस, साबण अंगाचे आणि कपड्याचे, डेटाॅल, औषधे तूर डाळ, मूग डाळ, चादरी,टाॅवेल, महिलांची समस्या लक्षात घेत सॅनिटेन पॅड, माचिस बॉक्स, मेणबत्ती,खोबरेल तेल, महिलांचे व मुलींचे ड्रेस,  साड्या, लहान मुलांचे कपडे, मच्छर अगरबत्ती, मीठ, फरसाण, पोहे,टूथपेस्ट ब्रश अधिक वस्तूंचा समावेश करत हे किट तयार करून पूरग्रस्तांना घरपोच करून मदत करण्यात आली.

ना भूत न भविष्य पूरपरिस्तिती पाहता डोळ्यातील अश्रुंचे पहाट अनावर होत आहेत तळमजला पूर्ण बुडून पहिला माळा देखील बुडल्यानं येथील नागरिकांची व कुटूंबाची झालेली वाताहत दुकाने गाळे व्यवसायिकांवर उभे राहिलेला संकट याला सामोरे जात येथील नागरीकांचा लोकांचा धीर खचलेला आहे, हतबल झालेले नागरिक आता एक मेकांना धीर देत आहेत.पण डोळ्यातील चमक मात्र तशीच आहे, ही त्याचीच ग्वाही आहे की मी पुन्हा भरारी घेईन.पुराच्या पाण्याने सर्वकाही हिरावून घेतले मोठी आपत्ती रायगड वाशीयांवर निर्माण झाली अनेक घरे उध्वस्त झाली त्यात महाड येथील तळीये गाव दरडीमुळे पूर्णतः भुईसपाट झाले यात अनेकांनाचा जीव गेल्याने सारे रायगडकर हादरले त्यांच्या डोळ्यातील अश्रू आज देखील भयावह घटना सांगून जात आहे अश्रुंचे पाट वाहत आहेत,या दुःखमय घटनेची जाणीव उराशी बाळगत चिल्हे ग्रामस्थ नागरिकांनी एक हात मदतीचा येथील कुटूंबाना आधार देत मदत केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.