Press "Enter" to skip to content

अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेला काशीद पूल वाहतुकीस बंद

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात नुकसान होत नागरिकांची वाताहत झाली आहे.त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक पूल क्षतिग्रस्त झाले आहेत. त्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पूलावरून वाहतुकी बंदकेली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.या क्षतिग्रस्त पुलामध्ये मुरूड तालुक्यातील काशीद पुलाचादेखील समावेश आहे.

11 जुलै 2021 रोजी मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील काशीद पूल हा वाहून गेला होता.या पूल दुर्घटनेमध्ये तालुक्यातील मौजे एकदरा येथील बेलदार समाजाचे विजय चव्हाण यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर भायदे परिवार यांची कार ही त्या दुर्घटनेमध्ये सापडूनही त्यांचे दैव बलवत्तर म्हणून त्या सर्वांचा जीव वाचला होता.

काशीद पूल दुर्घटना घडल्यानंतर त्याठिकाणी तातडीने भारतीय जनता पक्षाक्षे दक्षिण जिल्हा प्रमुख ऍड.महेश मोहिते पोहचले होते.त्यांनी तेथे शासन सहित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर आगपाखड केली.आणि सदर पूल दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे सुद्धा सांगितले होते.आणि त्यांनी या पूल दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

12 जुलै2021 रोजी अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी,पालकमंत्री आदिती तटकरे,तसेच महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज अध्यक्ष राजू साळुंके,आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार यांनी सुद्धा भेट दिली होती.

पालकमंत्री अदिती तटकरे,आमदार महेंद्र दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांच्यासमवेत पाहणी करीत त्यांना सदर पुलाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.तर महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज अध्यक्ष राजू साळुंके,आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार यांनी सदर पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्याबा अशी विनंती केली होती.

बोर्डी -ठाणे- उलवा-रेवस-रेड्डी हा रस्ता प्ररामा ०४मधील काशीद आर्च ड्रेन २५८/१५० ह्या रस्त्यावरील काशीद पुलाच्या मोरीचे काम प्रगतीत असल्याने या पुलावरची वाहतूक बंद केली असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

याबाबत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर पुलाचे काम सुरू आहे.काम पूर्ण झाले की त्यावरील वाहतूक ही सुरू करण्यात येईल.पूल हा सोमवारी सुरू होणार की नाही याबाबत त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

सदर पुलाचे काम तातडीने व्हावे यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांनी विशेष प्रयत्न घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.