मार्च 1992 साली मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर होणार होते पोलीस ठाणे
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
मार्च 1992 साली मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ततत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी रायगड जिल्ह्यात सागरी पोलीस ठाणे उभारण्यात येईल असे जाहीर केले होते.यामध्ये जिल्हयातील बोर्ली येथील औट पोस्टचा समावेश होता मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे बोर्ली येथिल मंजूर सागरी पोलिसठाणे रखडलेले आहे तरी सागरी पोलीस ठाणे केव्हा होणार ? असा सवाल ही उपस्थित होत आहे.
12 मार्च 1993 साली मुंबईमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बारा सिरियल बाॅम्बस्फोटांनी अवघी मुंबई हादरुन गेली होती.सदर बाॅम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावच्या समुद्रकिनारी उतरविल्याचे पोलिसी तपासात निष्पन्न झाले होते.त्यामुळे राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील काही समुद्रकिनार्यांच्या संरक्षणासाठी सागरी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यात मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला येथिल पोलिस ठाण्याचा समावेश होता.परंतु योग्य त्या पाठपुराव्याअभावी गेली पंचविस वर्षे ते कागदावरच असून ते अद्याप सुरु झालेले नाही.
मुरुड तालुक्यातील एकूण चोविस ग्रामपंचायती पैकी दहा ग्रामपंचायतीच्या हद्दींचा समावेश हा रेवदंडा (अलिबाग) पोलिस ठाण्यात केलेला असून उर्वरित चौदा ग्रामपंचायतीतील जनतेच्या रक्षणाची जबाबदारी मुरुड पोलिस ठाण्याकडे आहे.मुरुडच्या दक्षिणेकडील सावली, केळघरपासून उत्तरेकडील काशिद बीचपर्यंतची हद्दीचा त्यात समावेशअसून.बारशिव खिंडरस्त्यापासून तलेखार गावापर्यंतची हद्द
रेवदंडा पोलिसठाण्याकडे आहे.यामध्ये हिंदू मुस्लिम मिश्रीत सात गावाचा समावेश आहे.

तालुक्यातील साळाव येथिल जेएसडब्ल्यु ह्या कंपनीसह बारशिव गावाजवळील निर्मनुष्य असा खिंड रस्ता,उसरोली-सुपेगाव-खिंड रस्ता,नांदगाव बिच या ठिकाणी नेहमीच अपघात अथवा घातपात,चोरी डाके दरोडे पडत असतात.
येथे येणार्या पर्यटकांना नेमके कोणते पोलिस ठाणे गाठायचे हे कळत नाही.शिवाय दोन्ही पोलिस ठाण्याहून पोलिस येण्यासाठी अर्धातास तरी वाट पाहावी लागते. शनिवार ,रविवार अथवा सुट्टिच्या दिवसात येथिल समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी मुरुड पोलिस ठाण्याचा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो.
काही वेळेस येथे सामाजिक व अन्य अप्रिय घटना घडतात.साळावच्या जेएसडब्ल्यु कंपनीत वाद, तंटेबखेडे किंवा दुर्घटना घडतात.अथवा येथिल जंगली भागामुळे चोरट्यांना देखिल पळून जाण्यास वाव मिळतो.या सर्व गोष्टींवर पोलिसी नजर ठेवण्यासाठी बोर्ली सागरी औटपोस्टची अत्यंत गरज आहे.गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वी नबाब काळात यशवंतनगर पंचक्रोशीतील मजगावमध्ये एक पोलिस चौकी कार्यरत होती.परंतु कालांतराने ती बंद करण्यात आली.तेव्हापासून या भागाची जबाबदारीही मुरुड पोलिस ठाण्यावर पडली आहे.स्थानिक वाढती लोकसंख्या व बाहेरून येणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता सदर सागरी पोलिस ठाणे पुनरुज्जीवीत करणे क्रमप्राप्त ठरले आहे.अशा आशयाचे एक निवेदन मुरुड तालुका पत्रकार संघाने विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांना दिले आहे.








Be First to Comment