सामाजिक कार्यकर्ते मनोज कोळी यांची मागणी
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कैवारी, साडेबारा टक्के कायद्याचे जनक लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांचे तैलचित्र(फोटो)महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावे अशी मागणी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज जनार्दन कोळी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून केली आहे.
महाराष्ट्रातील विशेषतः नवी मुंबई, ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यातील कामगार, शेतकरी कष्टकरी,गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यात माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील साहेब नेहमी अग्रेसर राहिले आहेत. गर्भलिंग कायदा, साडेबारा टक्केचा ( जमीन नुकसान भरपाईचा) कायदा असे अनेक कायदे त्यांच्यामुळे झाले. अनेकांना विविध क्षेत्रात त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्या कार्यांची, विचारांची आठवण येणाऱ्या पिढीला व्हावी. दि.बा. पाटील यांचे स्मरण जनतेला कायम स्वरूपी राहावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लोकनेते दि.बा.पाटील यांचे तैलचित्र(फोटो) लावण्यात यावे अशी मागणी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आल्याची माहिती गव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज जनार्दन कोळी यांनी दिली आहे.








Be First to Comment