महाड पूरग्रस्तांना ७०० चादर, ७०० ब्लॅंकेट आणि १४०० टॉवेलची मदत
सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |
समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पनवेल अर्थात व्हीडीआयपीएलच्या वतीने महाड पूरग्रस्तांना ७०० चादर, ७०० ब्लॅंकेट आणि १४०० टॉवेल आदी साहित्याची मदत पाठविण्यात आली आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीडीआयपीएलच्यावतीने पनवेल येथून महाड येथे मदत साहित्य रवाना झाले. यावेळी उद्योजक अजय कांडपिळे, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, रमेश देशमुख, व्हीडीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख,संचालक अमोल देशमुख, युवा नेते गौरव कांडपिळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुराचे संकट आले. या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात आणि धीर दिला जात आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडने यापूर्वीही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, असे सांगून पूरग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे, असेही म्हंटले.








Be First to Comment