Press "Enter" to skip to content

मनसेचे शिलेदार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले,पूरबाधितांना दिलासा देण्याचा प्रयत्न

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रायगडसह कोकणात महापुराने तेथील जनजीवन पुरत विस्कळित झाले आहे.अशा पूरबाधितांचे जीवन पुर्वंवत करण्यासाठी सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनेकडून मदत केली जात आहे.यासाठी रसायनी वृंदावन येथील पनवेल तालुका मनसेचे अध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांच्यासह मनसेचे शिलेदारांनी आपली नैतिक कर्तव्य समजून विविध जिवनावश्यक वस्तूंनी भरलेला टेम्पो खेड परिसरातील पूरबाधितांना मदत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.’एक हात मदतीचा’ या उद्देशाने मदत नव्हे कर्तंव्य आहे असे तालुका अध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांनी बोलताना सांगितले.

यावेळी पनवेल तालुका मनसेच्या वतीने साड्या 250 नग,चटईं 250 नग,ब्लॅकेट -250 नग,टाॅवेल-250,जेवणाचे ताट-150नग,पुरुषांना फुल पॅट-250 नग, लहान मुलांचे कपडे-150 नग,लेडीज कुर्तां व लेंगिज-250,लेडिज सॅडल-100 जोड,जेन्टस शुज-150 नग,डिडिटी पावडर-3 गोणी, मास्क-500 नग, हॅण्डग्लोज-500 नग,फरसाण-600 पॅकेट आदी साहित्य खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन वाटप करण्यात आले.यावेली सोबत मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.