आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचा 200 हून अधिक पूरग्रस्तांना मदतीचा हात
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
महाड तालुका सह आजूबाजूच्या गावांना पुराचा प्रचंड फटका बसला असून महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला असून सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यातच विद्युत पुरवठा देखील गेल्या सात दिवसांपासून खंडित झाला असून महाडकर अंधारात आहेत.पूर ओसरल्यानंतर महाड पोलादपूरकरांचा मदतीसाठी अनेक हात देखील धावून आलेले असून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने देखील मदतीचा हात दिला आहे.
पुरामुळे महाड-पोलादपूरची परिस्थिती भयानक झाली असून परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था महाडकरांच्या मदतीसाठी धावून आली असून तालुक्यातील संवाद व कोथेरी येथील जवळपास दोनशे पूरग्रस्तांना संस्थेने मदतीचा हात दिला. असून पूरग्रस्तांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी आम्ही नेहमीच पाठीशी आहोत असे आश्वासन यावेळी संस्थेकडून देण्यात आले.

यावेळी आगरी कोळी कराडी सामाजिक संस्थेचे.पदाधिकारी किरण पवार, रोहन पाटील, गौरव म्हात्रे, चेतन गावंड, रवींद्र भोईर, सुमित थळी, संग्राम ठाकूर, विशाल पाटील, करण नारंगीकर, अंकुर पाटील, वृषभ गोंधळी, गणेश नाईक, प्रमेय फडके, प्रदीप पाटील, गोपीनाथ भगत, कुणाल नाईक, रोशन म्हात्रे, प्रज्योत शेट्ये, अनिरुध्द मेन, केतन पाटील यांच्यासह 35-40 कार्यकर्ते उपस्थित होते..









Be First to Comment