सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पृथ्वीच्या वातावरणात सातत्याने वाढ होत असल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.पुरांचे लोंढे जनजीवन विस्कळीत करत आहेत ,वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने रोगराई प्रमाणही वाढत आहे , या सर्व बाबींचा विचार करता , पर्यावरण पुरस्कार विजेते , महाराष्ट्र आयकॉन- २०२१ मानकरी ,केंद्रीय रेल्वे सल्लागार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने रसायनीमधील रसायनी रागा’ज मित्र मंडळाने आई डे केयर पेण ह्या दिव्यांग मुलांच्या हॉस्टेल सभोवताली अनेक फळ वृक्षांची लागवड करण्यात आली .
आई डे केयर संस्थेच्या अध्यक्ष स्वाती मोहिते यांनी दिलेल्या हाकेला साथ देत हा कार्यक्रम करण्यात आला . ह्या कार्यक्रमावेळी सिद्धांत म्हात्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की आई डे केयर या संस्थेने अनेक संकटातून मार्ग काढत गरीब – गरजू दिव्यांग लहान मुलांना आपल्या शिकवणीतून समाजात वावरण्याची संधी दिली आहे .

दिव्यांग लहान मुलांना शिकवत असताना अनेक आव्हानांना समोर जावं लागतं . कधी कधी ते विद्यार्थी अचानक अधीर होत असतात. त्यावेळी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते . गेल्या १० ते १२ वर्षामध्ये पेण , जिते , सावरसई , त्याचप्रमाणे इतर तालुक्यातील विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून शिकली . विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्याने त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा.अनेक विद्यार्थ्यांनी ग्रिटींग कार्ड्स , पणत्या , इत्यादी प्रकारच्या सुंदर वस्तू बनवून आपलं स्थान समाजात सिद्ध केलं .अभिजित पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना पर्यावरण संवर्धन याबद्दल समाजाची मानसिकता ही संवेदनशील असावी असे म्हणाले.
यापुढे ही पुढील वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण लागवडीसाठी त्यांचं मोलाचे योगदान राहील ही ग्वाही दिली .येणाऱ्या काळात वृक्षलागवडीसोबत त्याच संवर्धन तसेच वृक्षतोडविरोधी कृती आराखडा तयार करण्याबाबतही त्यांनी राज्यसकारसोबत चर्चा करणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.
रसायनी रागा ‘ज मित्र मंडळ ह्या सामाजिक सेवेसाठी सदैव तत्पर असेल ही भूमिका अध्यक्ष वाजिद शेख यांनी मांडली . त्यावेळी त्यांचे सहकारी स्वप्नील भोवड , धनंजय जांभुलकर , रोहित वाघमारे , मिथुन साळुंखे , रवी पवार , अर्जुन चव्हाण , प्रसाद माळी हे उपस्थित होते.








Be First to Comment