Press "Enter" to skip to content

सरफळेवाडी येथे कृषी सल्ला केंद्राचे शानदार उद्घाटन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

सरफळेवाडी (ता. रोहा )येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी विद्यालय अकलूज येथील कृषीदूत सिद्धेश बाळाराम सरफळे यांच्या वतीने सरफळे वाडी येथे आयोजित कृषी सल्ला केंद्राचे शानदार उदघाटन सरफळेवाडी येथील चंद्रकांत पवार यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी बाळाराम सरफळे, एकनाथ पार्टे, अविनाश येरुणकर, इंद्रजित घाडगे, राघो सरफळे, ऋषिकेश सरफळे, महेश सरफळे, व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागरूकता केंद्र सुरु केले असून त्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना वेळोवेळी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती क्रुषीदूत सिद्धेश सरफळे यांनी यावेळी दिली आहे.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी. पी. कोरटकर,प्राचार्य आर. जी.नलवडे, प्रा. एस. ए. एकतपुरे, प्रा. एस आर आडत,प्रा. डी. एस. मेटकरी,यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत सिद्धेश सरफळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या प्रसंगी सिद्धेश सरफळे यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेऊन आंबा व काजू फळ बाग व्यवस्थापन, त्यावर येणारे इतर रोग व किडी याबाबत घ्यावायची काळजी, त्याबाबत ची उपाय योजना,खत व औषधं व्यवस्थापन, साठवणूक व निर्यात व्यवस्थापन व फायदे तोटे इ. बाबत सुयोग्य असे मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.