सिटी बेल |महाड | मनोज पाटील |
न भूतो न भविष्यति अशा अतिवृष्टीमूळे कोकण किणारपट्टीवरील रायगड जिल्हातील महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामूळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांची मोठी वाताहत झाली आहे.अशा आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून सुधागड एज्यकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल परिवाराच्या वतीने महाड शहरातील वेताळवाडी ,तांबडभवन तसेच महाड शहरालगतच्या आजूबाजूच्या गावातील १८० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू चादर , बेडशीट ,साडी व टाॅवेल देवून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेळोवेळी धावून जात असते. या वेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे ,उच्य माध्यमिक विभागाचे प्रमुख बी.डी.कसबे,कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे ,सुरेश शिंदे ,एस्.पी. पाटील ,नझिर शेख,एस्.पी.सावंत ,सामाजिक कार्यकर्ते अजय सुर्यवंशी ,मनोज पाटील, एस्.एन्.मोरे,के.ए.पाटील,
जे.एस्.माळी , अोंकार नाईक ,गजानन पाटील,बी.बी.महाजन,लिपिक प्रसाद सहस्रबुध्धे ,रविंद्र देसले,एस्.एस्.किर्तने,उत्तम कुंभार ,आर.बी. पिंजारी ,विलास मुकादम, किरण मांगले,शशी पाटील,महादेव शिंदे आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.









Be First to Comment