Press "Enter" to skip to content

मुंब्रा – पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती

सिटी बेल | पनवेल |

तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून कार्बन डाय ओक्सिजन ची वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस गळती होण्याची घटना गुरुवारी(ता.29) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे.

मुंब्रा – पनवेल महामार्गावरील खिडूकपाडा परिसरात घडेलेल्या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. घटने दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये या करिता सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.