अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भरलेला टेम्पो महाडला झाला रवाना
सिटी बेल | पनवेल |
कोकणात पडलेल्या मुसलधार पावसामुळे दरडी कोसळून रत्नागिरी, चिपळूण, महाड येथिल नागरीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. इंटकचे राष्ट्रीय सचिव कामगार नेते महेंद्र घरत हे नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत असतात.
कोरोना असो, दुष्काळ असो किंवा एखाद संकट असो ते नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असतात याच सामाजीक बांधीलकीतून महेंद्र घरत यांनी आपल्या न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना व युवक काँग्रेस कमिटी उरण यांच्या विद्यमाने जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, मेणबत्ती, कपडे, पाणी, बिस्कीटे या स्वरूपाची मदत महाड वासीयांना पाठविली आहे.

महापूरामुळे येथिल नागरीकांना अंगावार घालायाला कपडे उरले नाहीत की पिण्यासाठी पाणी व पोटासाठी अन्न मिळत नाही अशा वेळी समाजातील सर्व घटकांनी पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करा असे आवाहन यावेळी महेंद्र घरत यांनी केले आहे.








Be First to Comment