Press "Enter" to skip to content

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खांदा कॉलनीतील शिवसेनेचे शिलेदार रवाना

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद

सिटी बेल | खांदा कॉलनी |

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनाला आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना खांदा कॉलनी शहराच्या वतीने महाड,खेड, चिपळूण येथील पूरग्रस्तांना छोटीशी मदत म्हणून अन्नधान्याचे किट घेऊन शिवसेना खांदा कॉलॉनीतील पदाधिकारी मदतीसाठी रवाना झाले.

या मदत कार्यास उप महानगरप्रमुख लीलाधर भोईर, शहरप्रमुख सदानंद शिर्के , उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर, उपशहरप्रमुख संपत सुवर्ण, शहर संघटक संतोष जाधव, युवासेना उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपशहर संघटक प्रकाश वानखेडे व संजीव गमरे, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, उपकर्यालय प्रमुख मोतीराम नगाम, युवासेना उपशहर अधिकारी प्रतीक कारंडे, युवासेना शहर चिटणीस कु.सुयश बंडगर, विभाग अधिकारी कु.आभेश् ओंबळे, शाखा प्रमुख पुंडलिक म्हात्रे, अरविंद कासारे, अतुल घुग, उपशाखा प्रमुख जयवंत भायदे, युवासेना शाखा अधिकारी सौरव महामुलकर, ऋषिकेश घुले शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.