सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
शिरीष कडू यांनी रोटरी क्लब ऑफ उलवा नोडच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कोरोना काळात वर्षभरात कार्य उत्तम केले होते. या कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनिवड करण्यात आली.
गुरुपौर्णिमा या दिवशी हा पदग्रहण सोहळा साई मंदिर वहाळ येथे संपन्न झाला. त्यावेळी अध्यपदाची सूत्रे शिरीष कडू यांनी स्वीकारली तर सचिवपदी निलेश यांची निवड करण्यात आली. याकामी डॉ. राहुल वंजारी, डॉ. दीपाली गोडघोटे यांनी योगदान दिले.
यावेळी उलवा नोडचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, राजू मुबंईकर, मो. का. मढवी गुरुजी, डॉ. दीपाली गोडघाटे, माजी जिप सदस्या पार्वतीबाई पाटील आदी उपस्थित होते. उलवा नोडच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी शिरीष कडू यांची फेरनिवड करण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment