सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
औरंगाबाद येथे शब्दगंध प्रकाशन समुह औरंगाबाद आयोजित विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२१ पार पडला. यामध्ये विविध विभागातील पुरस्कारासाठी २५०० नामांकनापैकी ९० नामांकन निवडण्यात येऊन त्यांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यापैकी कर्जत रायगड येथील शेलु गावातील ॲड. संदिप गोपाळ बागडे यांना साहित्य विभागातील “साहित्य गौरव पुरस्कार २०२१” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ॲड. संदिप बागडे यांनी विविध विषयांवर काव्य लेखन केले असून अनेक वेळा मानांकन मिळविले आहे. त्याच्या काव्यातून सामाजिक संदेश दिला जात असल्याने यापूर्वी त्यांना “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना त्यांनी अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. तसेच रुईया कॉलेज, सेंट जोसेफ कॉलेज अशा महाविद्यालयांच्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतही त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच यापूर्वी ॲड.बागडे यांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान २०२० मध्ये सहभागी होऊन स्वरचित काव्य सादर करून “छंदोगामात्य संमेलन भावस्पर्शी मानकरी” किताब पटकावला होता. तसेच त्यांना या मंचातर्फे “साहित्य कला साधक मानकरी” या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नावलौकीक मिळविलेले कर्जत तालुक्यातील ॲड. संदिप बागडे यांना यापूर्वी “साहित्य भरारी पुरस्कार”, “निलरत्न पुरस्कार”, “सावली रत्न पुरस्कार” या पुरस्कारांनी तसेच WOW World Record मार्फतही त्यांना प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. लॉक डाऊन कालावधीत ॲड. संदिप बागडे यांनी उत्कृष्ठ काव्यलेखन करून सुमारे २०० हून अधिक प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत. नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या विविध पुरस्कार प्रदान सोहळ्यात ॲड. संदिप बागडे यांना साहित्य विभागातील “साहित्य गौरव पुरस्कार २०२१” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.








Be First to Comment