Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत इलेक्ट्रिक कारला तरुणांची पसंती

पेट्रोल – डिझेलच्या वाढीव किमतीमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा नागरिकांचा कल

सिटी बेल | नवी मुंबई |

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे भारतातील नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला असून इलेक्ट्रिक कार नागरिकांचे तसेच खास करून तरुण पिढीचे आकर्षण ठरत असून वाशीमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या फॉर्च्युन कार्स इथे आलेल्या इलेक्ट्रिक कार बघण्यासाठी तरुण मंडळींची गर्दी होत आहे.

फॉर्च्युन कार्स मधील दालनामध्ये टाटा मोटर्स च्या विविध कार उपल्बध असून टाटा नेक्सॉन इव्ही कार हे मुख्य आकर्षण ठरत आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे २०२१ मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत.

टाटा नेक्सॉन इव्ही एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. देशभरातील इलेक्ट्रिक सेगमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, देशात ७५० युनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये टाटाच्या नेक्सॉनचं वर्चस्व दिसून येत आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे. पण टाटा नेक्सॉन या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. भारतीय बाजारात टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची शोरूम किंमत १३.९९ लाख ते १५.९९ लाखांच्या मध्ये आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत टाटाची एसयूव्ही नेक्सॉन गाडी सर्वात सुरक्षित मानली जात आहे. टाटा मोटर्सने सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सॉन गाडी या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली होती. टाटा एसयूव्ही नेक्सॉन विक्रीच्या बाबतीतही सर्वात पुढे आहे, अशी माहिती फॉर्च्युन कार्सचे चेअरमन श्री विनोद शर्मा यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.