Press "Enter" to skip to content

मदत नको सेवा करूया : डॉ.प्रज्ञा भोईर यांचे आवाहन

वाचा काय म्हणतात डाॅ.प्रज्ञा भोईर : त्या निघाल्यात थेट चिपळूण ला तुम्ही सोबत जाणार का ?

सिटी बेल | पनवेल |

परवा च्या महापुरात कोकण चे चित्रच पालटून गेले आहे.सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे.माणूस म्हणून आपल्यातली माणूसकी जगोजागी दिसत आहे.प्रत्येकजण आप आपल्या परीने मदत ही करत आहे.अगदी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मदतीचाही महापुर येत आहे…..

पण बहुतांश मदत ही वस्तु आणि पैसे ह्यांच्या स्वरुपात पोहचत आहे जी तेवढीच आवश्यकही आहे.पण तिथल्या स्थानिक व्यक्ति बरोबर बोलेल्यानंतर समजले की सध्य्या त्यांना सफाई कामगार,आरोग्य सेवक आणि आरोग्य सुविधा यांची गरज जास्त आहे.

उदाहरण दयायचे झाले तर….. सर्वच ठिकाणी चिखल झाला आहे…..तो साफ करण्यासाठी मनुष्य बळ कमी पड़त आहे.स्थानिक आप आपल्या परीने साफसफाई करत आहेत पण ते करत असताना कित्येकाना काचा, लोखंडी पत्रे लागून दुखापत होत आहे,बरेच दिवस पाण्यात काम केल्यामुळे पाय कुजू लागले आहेत , गुरे-ढोर मेल्यामुळे वेगवेगळे आजार उदभवु लागलेत,शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे उलटी, जुलाब ह्या सारखे आजार उदभवु लागले आहेत….आणि ह्या सर्वांसाठी त्यांना औषधे आणि डॉक्टर ह्यांचीही खूप जास्त गरज आहे.

मी एक डॉक्टर म्हणून सेवा करायला चिपळूण येथे काही दिवसांसाठी जात आहे ,आपल्यापैकी कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत किंवा सेवा करण्याची इच्छा असेल तर ८६९२९९९०९० ह्या माझ्या नंबर वर मला २४/७…..कधीही संपर्क करु शकता🙏🙏🙏.

आपलीच
डॉ. प्रज्ञा भोईर
८६९२९९९०९०

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.