Press "Enter" to skip to content

महिसदरा नदीवरील पुल मोजतोय अखेरची घटका : वाहतुकीसाठी धोकादायक

पुलाच्या कठड्यांना दोरीचा आधार : प्रवाशांच्या जिवाला धोका

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीवरील पुल वाहातुकीसाठी धोकादायक असुन या पुलाचे कठडे तुटले असुन या कठड्यांना दोरीचा आधार दिला आहे.यामुळे या महामार्गावरुन करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

या महिसदरा नदीचा पुल ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असुन तो जीर्ण अवस्थेत आहे पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत.यामुळे या दोन्ही बाजूच्या कठड्यांना दोरीचा आधार दिलेला आह.यावरुन अवजड वाहन गेला तर हा पुल पूर्णपणे हादरला जात असल्याचे जाणवत आहे .त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे.शिवाय या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असुन हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

गेली दहा ते अकरा वर्षा पासुन मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरु असुन त्यात म्हणावी तशी प्रगती नाही.एकंदरीत कामाच्या वेगा वरुण या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही.मुंबई-गोवा मार्गावर अनेक पर्यटन स्थळे व औद्योगिक क्षेत्र आहेत यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरु असते त्यामुळे सतत मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते.यातुन घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्ष्यात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन अशा दुर्लक्षमुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर करोडो रुपये खर्च केले जातात.परंतु अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात अशा घटना न घडण्याअगोदर उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी,बांधकाम विभाग व संबंधीत व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे.असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.