रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार बबन दादा पाटील यांचा पुढाकार
सिटी बेल | पनवेल |
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज आणि रायगड जिल्हा शिवसेना यांच्या वतीने नुकतेच पूरग्रस्तांना 1000 किलो तांदूळ आणि डाळ मदत म्हणून प्रशासनाच्या हवाली करण्यात आले. सन्माननीय शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने हा कोरडा शिधा पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल तहसीलदार विजय तळेकर यांनी त्यांचे आभार मानले. तातडीने हा शिधा माणगाव येथील लंगर चालविणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडे पोहोचविण्यासाठी टेम्पो रवाना झाला. तहसीलदार तळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे माणगाव या ठिकाणी रोज पंचवीस हजार लोकांचे जेवण बनविण्यात येत असून ते महाड,पोलादपूर, गोरेगाव यासारख्या पूरग्रस्त विभागांच्यात वाटण्यात येते.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असता बबन दादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी गरजवंतांना कोरडा शिधा वाटप करण्याचे मी जाहीर केले होते.

या दरम्यान रायगड जिल्ह्यासह कोकणपट्टीत मुसळधार पावसाने हैदोस घातल्या नंतर आलेल्या पुराने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले. त्यामुळे उद्धव साहेबांच्या जन्मदिनी पूरग्रस्तांना हा कोरडा शिधा देत असताना अत्यंत समाधान लाभत आहे. तसेच जे प्रशासन दिवस-रात्र एक करून पूरग्रस्तांची मदत करत आहे त्यांच्या हवाली आपली मदत गेली पाहिजे अशी आमची भावना असल्या कारणामुळे आम्ही पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे आमची मदत सुपूर्द केली.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांच्या समवेत रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहरप्रमुख अच्युत मनोरे, युवासेना अधिकारी पनवेल ग्रामीण महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना (पनवेल तालुका चीटणीस) केवल माळी, विभागप्रमुख नंदू घरत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment