Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील नसरापूर गावातील खंडीत वीजपुरवठा ६ दिवसांनी सुरू

गावकऱ्यांच्या मदतीने महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी उभारले पुरामध्ये पडलेले पोल

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील नसरापूर गावातील वीजपुरवठा महापुरामुळे 6 दिवसापासून खंडित झाला होता तो वीज पुरवठा आज पूर्ववत करण्यात आला. ब्रिटिश काळात तालुक्याचे ठिकाण असलेले नसरापूर गाव महापुरामुळे 6 दिवसांपासून अंधारात होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक शिवमंदिराजवळ 6 विजखांब महापुरामुळे पडले होते. दोन विजखांब तर नदीकाठी असल्यामुळे महापुरात वाहून गेले आणि त्यामुळे गावातील सर्वांची विजेअभावी मोठी गैरसोय निर्माण झाली होती. महावितरण कडाव सेक्शनचे सहाय्यक अभियंता रितेश साबदे त्याच बरोबर वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक कारले यांच्या विशेष सहकार्याने सदरचे काम करण्यात आले. युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, समाजसेवक संतोष मोहिते,गोविंद भोईर, हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.

नसरापूर गावातील प्रभाकर मोहिते, दयानंद मोहिते,नितीन बोराडे,नरहरी थोरवे, रज्जाक शेख,अनिल साळुंखे,कैलास मोहिते,अर्जुन मोहिते,सुरेश देवघरे, कृष्णा मोहते,दीपक मोहिते,नाना मोहिते,हरीचंद्र मोहिते,रवींद्र मोहिते, चिंचवली येथील अतुल हडप,सचिन हडप,सौरभ राऊत,प्रसाद कर्णूक,रोहन मोहिते, प्रल्हाद मोहिते, सुशांत मोहिते हे गावातील ग्रामस्थ दोन दिवसांपासून सदरच्या कामासाठी धावपळ करत होते अशोक कारले यांनी तर कोणत्याही परिस्थितीत नसरापूर मध्ये आज लाईट पोहचलीच पाहिजे या जिद्दीने काम केले आणि आज अखेर नसरापूर येथे 6 दिवसाने लाईट आली ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर च्या आणि नसरापूर ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कर्मचारी वर्गाचे जाहीर आभार मानण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.