वाचा कोण होते माणिकराव जगताप ? पत्रकार अरूणकुमार जैन यांचा स्पेशल रिपोर्ट
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती.कोविडची लागण झाल्याने मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते.
रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केलं. विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले . परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले. त्यांच्यामागे पत्नी , मुलगा , मुलगी, भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार आहे
कोण होते माणिकराव जगताप ?
काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष
महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार
महाड नगरपालिकेवर 15 ते 20 वर्ष वर्चस्व
रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख
दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते
माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा








Be First to Comment