सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना तहसील कार्यालयाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुका जलमय झाला होता, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्जत नगरपरिषद क्षेत्रात कर्जत न्यायालय परिसर, इंदिरानगर,बामचा मळा, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर मधील सत्यम अपार्टमेंट,निलेश अपार्टमेंट,चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, सिद्धार्थ नगर ज्ञानदिप सोसायटी या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरातील वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या, घरातील धान्य, सोफे, गाद्या भिजल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई येथील रहिवासी मात्र कर्जत तालुक्यात व्यावसायिक असलेले चरनदीप सिंग,त्यांच्या मातोश्री पिंकी सिंग यांनी कर्जत तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहून तहसीलदार विक्रम देशमुख यांना जीवनावश्यक वस्तूचे किट दिले. तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी मिलिंद ति-हेकर, तलाठी दत्ता ठोकळ, तलाठी वैभव आंबोलकर, तलाठी आशीष राऊत, तलाठी अभिजित हिवरकर, कोतवाल सोपान पाटील यांनी बामचा मळा येथील रहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तूचे किटचे वाटप केले.
सिंग परिवाराने आता 100 किट दिले आहेत अजून 300 किट देणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.








Be First to Comment