Press "Enter" to skip to content

विविध सामाजिक संस्थांमार्फत करंजाडे वनक्षेत्रात शेकडो देशी वृक्ष लागवड

सिटी बेल | करंजाडे | मनोज पाटील |

२३ जुलै हा वन संवर्धन दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. त्या सप्ताहाचे औचित्य साधून (दि.२५ जुलै )ला उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्था आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेकडो देशी रोपांची लागवड पनवेल वनविभागाच्या करंजाडे वनक्षेत्रात करण्यात आली.

यावेळी बांधिलकी प्रतिष्ठान, जय हिंद सेवा संस्था, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे ,वन्य जीव निसर्ग संवर्धन सामाजिक संस्थांचे आणि पनवेल वनविभागाचे वनक्षेत्रपाल संजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी वड, उंबर, पिंपळ, चिंच, कडूलिंब, बेल, बांबू, आंबा, साग, करंज, जांभूळ, काजू, फणस, अशी विविध रोपे वटवृक्ष सामाजिक संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आली होती. लागवड केलेल्या सर्व रोपांचे योग्य संवर्धन आणि त्याच परिसरात वन विभाग व इतर सर्वांच्या सहकार्याने आणखी शेकडो देशी रोपांची टप्प्या- टप्याने लागवड करू अशी ग्वाही निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश आहेर यांनी दिली. सुत्रसंचालन वटवृक्ष सामाजिक संस्थेचे मुख्य सल्लागार दिनेश पाटील केले. यावेळी उपस्थित अनेक मान्यवर, निसर्गमित्र, सर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.