सिटी बेल | उरण |
रानसई आदिवासी वाडीतील नागरिकांकरिता १५० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी आदिवासी बांधवांना ज्यूसचे वाटप करण्यात आले.
रायगड भूषण व केअर ऑफ नेचर चे सर्वेसर्वा राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, साई देवस्थान साईनगर व वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका श्रीमती माधुरी गोसावी, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ पार्वती रवीशेठ पाटील, सारडे विकास मंचाचे रोशन पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे प्रेसिडेंट शिरीष कडू व इतर रोटेरियन व आदिवासी बांधव उपस्थित होते.
Be First to Comment