गावातील कुटुंबे जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित
सिटी बेल | महाड | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्ह्याच्या महाड मधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेली हिरकणी वाडी गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धोकादायक स्थितीत बनली होती व आज तेथील दरड कोसळली आहे.
अतिवृष्टीच्या तडाख्यात येथील घरांच्या खालची माती खिळखिळी झाली होती.
अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. रायगडावरून मोठमोठे दगड हिरकणीवाडीच्या दिशेने येत आहेत. पावसाचा मारा सुरु असल्याने दरडीचा धोका वाढला आहे. वरुन येणारा कोणता दगड कोणाचा जीव घेईल, सांगू शकत नाही, अशी भीती येथील स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त होत आहे. येथील काही घरांना तडे गेल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरांना तडे गेले असून ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहेत.
तिथे कुणाचाही संपर्क होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, या गावातील कुटुंबे जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत.








Be First to Comment