सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
सातत्याने गेले काही दिवस पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी निर्माण झाले आहे.यामुळे विहीर,तलाव,छोटे जलाशय,नदी तुडुंब भरले आहे.तसेच रस्ते जलमय झाले आहे.यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी मार्गी लागला असले तरी,जगाचा पोशिंदा बळीराजा चांगलाच धास्तावला आहे.कारण शेत लागवडी साठी शेतात पेरलेले धन्याचे उत्तम राब तयार झाले आहे.मात्र हे राब पाण्याच्या खाली गेले असल्यामुळे ते कुजून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
तालुक्यातच्या काही ठिकाणी लागवड पुर्ण झाली असली तरी सुद्धा या पावसामुळे भात लागवड ची कामे खोळंबली आहे.यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.आता पावसाने थोडी विश्रांती घ्यावी असे साकडे जणू बळीराजा वरुण राजाकडे घालत आहे.राब कुजली गेली तर केलेले खर्च आणी वेळ वाया जाईल परंतु दुबार पेरणी करायची म्हणजे लागवडीचा काळ निघून गेलेले असतो.शिवाय लागवड लवकर झाली तर कापणी ही लवकर होत असते.
या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असते.मात्र सध्याची स्थिती अतिषय बिकट असल्याने बळीराजा पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.आता पावसाने थोडी विश्रांती घेतली तर लागवड करण्यास बळीराजा सज्य होणार आहे.असे मत शेतात काम करीत असलेलेल्या बळीराजाने व्यक्त केले.








Be First to Comment