Press "Enter" to skip to content

अश्विनी बिद्रे खटल्यात तारीख पे तारीख

आरोपीचे वकील आजारी, खटल्याची सुनावणी 30 जुलै रोजी होणार

सिटी बेल | पनवेल | अमूलकुमार जैन |

ए.पी.आय.अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला आज पनवेलच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात होता.आरोपींचे वकील ॲड. विशाल भानुशाली यांची प्रकृती अद्यापही स्थिर नाही, त्यामुळे आज देखील ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.या खटल्याची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होणार आहे.

विशेष सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत हे हा खटला सरकार पक्षाकडून लढत आहेत. ऍड. घरत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘आज कोर्टामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांचे वकील कोर्टामध्ये गैरहजर होते,ते काही साक्षीदारांना आव्हान देणार आहेत असा त्यांनी अर्ज न्यायालयात केला होता आणि आम्हाला फिर्यादी पक्षाला कळविला होते .त्यामुळे त्या साक्षीदारांचा जो पुरावा आहे तो आम्ही एफिडेविटवर न्यायालयात दिला आहे.

आरोपी क्रमांक 2 राजू पाटील यांच्या वकिलांनी त्यांना कोणत्या कोणत्या साक्षीदारांची उलट तपासणी करायची आहे हे आज कोर्टात सांगायचं होतं, ते आज ते कोर्टात जमा करणार आहे .आरोपींचे वकील आज कोर्टात हजर नसल्यामुळे आज कोर्टात विशेष काही झाले नाही, कारण यात एकंदर चार आरोपी आहेत.मुख्य आरोपी कुरुंदकर याला बाकीचे तीन आरोपी यांनी मयत अश्विनी बिद्रे यांचा खून करण्यासाठी आणि नंतर त्यांच्या प्रेताचे तुकडे करून ते तुकडे गोणीत भरून, वजन टाकून भाईंदर च्या खाडीत फेकून देण्यासाठी मदत केली व त्यानंतर सुद्धा पुरावा राहू नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली,अशा प्रकारे त्यांच्यावर कटामध्ये सहभागी होणे आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप करण्यात आले आहेत.

त्यादृष्टीने या खटल्याला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी हा खटला परिस्थितीजन्य पुरावा तसेच तांत्रिक आणि शास्त्रीय पुराव्यांच्या मदतीने आम्हाला सिद्ध करायच आहे. पुढच्या तारखेला या केसमध्ये बाकी साक्षीदार हजर राहणार आहे, तसेच आरोपी क्रमांक 2 राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीनअर्ज केला आहे. याच आठवड्यात 27 जुलैला उच्च न्यायालयात हा जामिनअर्ज सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. या अगोदरचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.’

ए.पी.आय. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, आणि महेश फळणीकर यांच्यातर्फे ऍड. विशाल भानुशाली हे बाजू मांडत आहेत. ऍड. भानुशाली हे 11 जून रोजी झालेल्या सुनावणीला न्यायालयात उपस्थित होते. त्यानंतर ते आजारी पडले त्यामुळे त्यांना पुढील कोणत्याही तारखेला उपस्थित राहता आले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्या साठी एक वर्षाची मुदत दिली आहे.ॲड. विशाल भानुशाली यांची प्रकृती अद्यापही स्थिर नाही, त्यामुळे आज देखील ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.या खटल्याची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होणार आहे.

More from राज्यMore posts in राज्य »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.