Press "Enter" to skip to content

अजगर घरात घुसला आणि कोंबड्या फस्त करत सुटला मग….

सिटी बेल| कडापे | प्रशांत म्हात्रे |

निसर्ग संतुलन आणि सापांची संख्या ही खूप खूप कमी होत चालली आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी संतुलन हे अतिशय महत्वाचे आहे. अन्नसाखळी सुद्धा खूप खुप महत्वाची कारण अन्नसाखळीत एक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो.

सर्पमित्र यांचे निसर्गाच्या रक्षणासाठी योगदान हे अतिशय बहुमोल आहे. सतत निजध्यास देऊन प्राण्यांची काळजी घेऊन जीवदान देत असतात. कडापे येथील रहिवाशी रुपेश म्हात्रे यांच्या घरात एक अजस्त्र अजगर आला. ज्या ठिकाणी कोंबड्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी त्याने मुसंडी मारली. मग प्रत्यक्षात या अजगरने त्या कोंबड्या फस्त करायला सुरुवात केली.

घरातल्या लोकांनी ताबडतोब सर्पमित्र रिषीकेश ला बोलावणं पाठवलं. सर्पमित्र रिषीकेश हा कडापे गावातील fon या संस्थेशी निगडित असणारा सर्पमित्र खुद्द कडापे येथील रहिवासी असल्याने तो लगेचच हजर झाला. त्यानंतर त्याने अगदी सहजपणे ह्या आजगरला पकडले.

सदर आजगरला पकडल्या नंतर त्याने जवळच्या कडापे येथील डोंगरात सुखरूप रित्या त्याला सोडण्याची सुद्धा जबाबदारी ही त्याने योग्य रित्या पार पाडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.