सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
गेले ४ ते ५ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांना पाणी घुसून मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. उरण बोरी येथील आनंद कुळकर्णी यांच्या घरात गेले २ ते ३ दिवस पाणीच पाणी झाले आहे. तरी सदर पाण्याचा निचरा करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेऊन यातून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उरण बोरी येथील ईनामदारनगर येथे नव्याने अनेक बांधकामे उभी राहिली आहेत. त्यातील काही बांधकामे अनधिकृत असल्याचे समजते. परंतु मतांवर डोळा ठेवून कोणताच राजकीय पक्ष त्या विरोधात आवाज उठवताना दिसत नाही.

या परिसरात नव्याने बांधकाम उभी रहात असताना नैसर्गिक पावसाळी पाण्याचा निचरा होणारे स्तोत्र बंद झाले आहे. त्यात गेली ४ ते ५ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेकांच्या घरांना पाणी गेले आहे. त्यात उरण बोरी येथील ईनामदार नगर येथील बरकस वाडीत रहाणारे आंनद कुलकर्णी यांच्या घरात गेली २ ते ३ दिवसांपासून पावसाच्या पाणी घुसले आहे. याचे वृत्त प्रसिद्ध होऊनही कोणी लक्ष देत नव्हते. आपल्याला पाण्यातून जाताना त्रास होतो, मग गेली काही दिवस घरात पाणीच पाणी असेल तर अवस्था किती बिकट होत असेल याचा विचार करवत नाही.

की नवीन ठेव म्हणजे काय गीत औरंगाबादआज पुन्हा घरात पाणी भरल्याचे फोटो आमच्याकडे येताच ते आम्ही फेसबुक व व्हाट्सएपच्या माध्यमातून व्हायरल केल्यानंतर पोलीस प्रशासनाने याची त्वरित दखल घेत नगरपालिका कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहेत. तसेच बोरीतील नगरसेवक अतुल ठाकूर यांनीसुद्धा याची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले आहे.








Be First to Comment