जाचक करप्रणाली विरोधात नगरसेवक रविंद्र भगत यांचे कळंबोलीत मुसळधार पावसात बेमुदत उपोषण सुरू
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या जाचक मालमत्ता कराला कडाडून विरोध करत नगरसेवक रविंद्र भगत यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. कोरोनाच्या महामारीत भरडलेल्या जनतेला संपविण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. तो मागे घेण्यात येत नाही तो पर्यत हे बेमुदत उपोषण चालू राहील असा इशार रविंद्र भगत यांनी पालिका प्रशासनाला दिला.
अन्य महानगरपालिकेच्या तुलनेत पनवेल महानगरपालिकेने लावलेला मालमत्ता कर हा अवाजवी असून तो नागरिकांवर अन्याय करणारा आहे तेव्हा नियमानुसार क्षेत्र सभा लावून त्याना विश्वासात घेवून लावण्यात यावा. चार वर्षाच्या बाळाची तुलना ३० वर्षाच्या तरुणासी ( नवी मुंबई महापालिका , ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महापालिका ) करताना सत्ताधा-यानी येथील जनतेची कोणतीही तमा बालगळी नाही. जनता करा विरोधात आक्रोश करत असताना आम्ही विशेष महासभा लावण्याची विनंती केली आहे. ती सभा लावली जात नाही एवढे सत्ताधारी मस्तावाल बनले आहेत जनता कोरोनाच्या महामारीत कसे जगावे या विवंचनेत असताना पालिकेने लावलेला जाचक कर रद्द करण्यात यावा. ४ वर्षात पालिका प्रशासनाकडून सिडको विकसित शहरात कोणतीही विकास कामे करण्यात आलेली नाहीत मग मालमत्ता कर येथील जनतेने का भरावा असा सवाल नगरसेवक रविंद्र भगत यांनी केला.

गेली चार वर्षापासून कळंबोली व परिसरातील कामा विषयी पाठपुरावा करत असताना विरोध म्हणून कामे केली जात नाहीत असा गंभीर आरोप रविंद्र भगत यांनी केला. कळंबोली सेक्टर १ मधील नाला बंद करण्यात यावा, कळंबोली गावातील नादुुस्त झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली आहे ती बांधण्यात यावी. बेलदारवाडी येथील नागरिक पाण्याच्या समस्येने हैराण आहेत तेथे पाण्याची टाकी बांधण्यात यावी, कळंबोली आदिवासीवाडी येथे स्टोरेज पाण्याची टाकी बांधण्यात यावी, कळंबोली आदिवासी बांधवांसाठी समाजमंदिर उभारण्यात यावे, कळंबोली स्मशानभूमीत विद्युत पाेल टाकण्यात यावेत, कळंबोली बौद्धवाडी येथेे बौद्धविहार व समाजमंदिर उभारण्यात यावे, लोक वर्गणीतून बांधण्यात आलेले काळभैरव सभा मंडप गावक-याकडे हस्तांतर करण्यात यावे असा अनेक महत्वाच्या मागण्या करत संततधार पावसात नगरसेवक रविंद्र भगत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर, प्रिया भोईर, नगरसेविका कमळ कदम, युवा नेते विजय पाटील, विजय भोईर, कमळाकर जले, आदिसह अनेक कार्यकर्ते नगरसेवक रविंद भगत यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजर होते.








Be First to Comment