रसायनीला मुसळधार पावसाने झोडपले
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केले असून भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेने मुसलधार पावसाचा इशारा दिला आहे.रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस रसायनी पाताळगंगा परिसरात मुसळधार पाऊस होवून परिसराला चांगलेच झोडपले असून पाताळगंगा नदिने दुपारी 20.80 धोक्याची पातळी इशारा ओलांडल्याने रसायनीकरांत भीतीचे वातावरण दिसून आले.

रसायनी पाताळगंगा परिसरात मुसळधार पावसामुळे ब-याच भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.जोरात पडत असलेल्या पावसाने पातालगंगा नदिही दुथडी भरून वाहत असल्याने असाच सोमवारच्या रात्रीपर्यंत पाऊस राहिला तर पुर होईल या भीतीने रसायनीकर होते.यासाठी पाताळगंगा नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.आपटा गावात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.तर रसायनीमार्गे आपटा हा मार्ग सखल भागात पाणी साचल्याने बंदच होता.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांत पाणी शिरल्याचे दिसून आले तर एमआयडीसी रस्ता पाण्याखाली गेला होता.तर कॅनरा बॅंक आवारात, रसायनी पोलिस ठाण्यात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले.तसेच खाने आंबिवली स्टेट बँक,मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया समोर, सेबी वलण ते एमएसीबी कार्यालय रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. परिसरातील अनेक भागात शेतातील भातलावणी वाहून गेली.

पावसाचा जोर कायम राहिल्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील नदि,तलाव, विहीर,नाले पाण्याने भरून गेली.मुसलधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.पाऊस असाच सुरू राहिल्यास पाताळगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून पुरपरिस्थिती निर्माण होईल यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.परिसरात मुसलधार पाऊस सुरू असतानाही विजपुरवठा व्यवस्थित सुरू होता.








Be First to Comment