सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून सातत्याने पनवेल महानगरपालिकेकडे शहरप्रमुख कुणाल कुरघोडे यांनी पाठपुरावा केल्याने नवीन विद्युत खांब उभारण्यास सुरवात झाली आहे.
शहरातील अनेक भागांत जीर्ण झालेले वाकलेले विद्युत खांब उभे आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या लाईन आळी परिसरातील भागात नवीन एकही खांब उभारण्यात आला नाही आहे. रस्त्याच्या मधोमध व वाकलेल्या दुरावस्थेत जुने विद्युत खांब असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी व दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. या नागरी समस्येबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पनवेल शहरप्रमुख कुणाल कुरघोडे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला व त्यांच्या मागणीची दखल घेत आता नवीन विद्युत खांब सदर ठिकाणी बांधण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे आभार मानले आहेत.








Be First to Comment