दरडग्रस्त भागातील 8 कुटूंबातील 35 जणांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली ; ४ घरांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे सतत पडत असलेल्या पावसाने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे. दरड कोसळून 3 ते 4 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरडग्रस्त भागातील 8 कुटूंबातील 35 जणांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात 18 आणि 19 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रेड अलर्टच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.









Be First to Comment