Press "Enter" to skip to content

खावटी योजना आदिवासी समाजाच्या हक्काची – पालकमंत्री अदिती तटकरे

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते खालापूर येथे खावटी वाटप कार्यक्रम

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

गेली काहि वर्षे बंद असलेली खावटी योजना लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आले असून जिल्ह्यात 48 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

शनिवारी खालापूर येथील खावती वाटप कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यातील आदिवासींना खावटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खावटी वाटप प्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी खावठी योजना आदिवासी समाजाच्या हक्काची असून कोरोना काळात पुन्हा सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले .आदिवासी स्थलांतरित कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. जिल्ह्यात तालुक्यात खावटी वाटप सुरू झाले असून जास्तीत जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले.

खावटी वाटप प्रसंगी प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पल वार, जिल्हा परिषद सदस्य ऊमा मुंडे, पद्मा पाटील, नरेश पाटील ,मोतीराम ठोंबरे पंचायत समिती सभापती वृशाली पाटील सह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे देखील कौतुक यावेळी उपस्थितांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.