सिटी बेल | कळंबोली |प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोणातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर शिव संपर्क अभियान घेण्यात येत आहे.
शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख, शिरीषशेठ घरत, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मौजे नितलस,खैरणे, वावंजे, कुत्तरपाडा,चिंध्रण, चिंचवली, शिरवली, आंबे, मौजे महालुंगी, मोबेॅ, खानाव, वाकडी,केवाळे,हरिग्राम,या ग्रामीण भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिव संपर्क अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता.
शिव संपर्क अभियान दौऱ्यात रामदास पाटील यांच्या समवेत भरत पाटील, शिवसेना संघटक पनवेल तालुका, दिपक निकम, शिवसेना विधानसभा संघटक, एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, योगेश तांडेल, शशीकांत भगत, दत्ता फडके, शिवसेना संघटक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, तसेच युवा सैनिक शिव संपर्क अभियानात सहभागी झाले होते.








Be First to Comment